Saturday, June 21, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home उद्योग-व्यवसाय

जाधववाडीत बाजार समितीच्या आंबा-मिलेट महोत्सवाचे उद्‌घाटन; राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले…

जाधववाडीत बाजार समितीच्या आंबा-मिलेट महोत्सवाचे उद्‌घाटन; राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले…
बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सहकारी संस्था या सगळ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या असाव्या. त्यासाठी आपसातले मतभेद बाजूला ठेवावे. आंबा महोत्सवासारखे आयोजन करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा संचालकांनी उपलब्ध करून द्याव्या, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज, २३ मे रोजी येथे केले.

एकदा चांगल्या कामाला सुरुवात केली, की त्याला लोकांचा विश्वास प्राप्त होतो. बाजार समिती मार्फत राबविल्या जाणाऱ्या शेतकरी हिताच्या सर्व उपक्रमात आपला सहयोग असेल, असे आश्वासन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आंबा मिलेट महोत्सव २०२५ चे उद्‌घाटन राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. आ. अनुराधा चव्हाण यांचीही या वेळी उपस्थिती होती. बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचे लोकार्पणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात आयोजित महोत्सवात आंबा उत्पादक शेतकरी, धान्य उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत आदींनी स्टॉल्स लावले आहेत. बाजार समितीचे सभापती डॉ. राधाकिसन पठाडे, संचालक रामूकाका शेळके, भगावन मुळे, मुरलीधर चौधरी, व्यवस्थापक नितीन पाटील, विभागीय सह निबंधक शरद दरे, एचपी कंपनीचे अजय सिन्हा आदी उपस्थित होते. हा महोत्सव पाच दिवस सुरू राहणार आहे. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, बाजार समितीचे कार्य चांगले असून शेतकऱ्यांसाठी ते महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे. शेतमालाची विक्री सुविधा उपलब्ध करणे यातून शेतकऱ्यांचे हित साधण्याच्या या कामात आपले नेहमीच सहकार्य आणि सहयोग राहिल, असे त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले. आ. अनुराधा चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. राधाकिसन पठाडे यांनी केले.

Previous Post

घटस्‍फोट न घेताच उरकले दुसरे लग्न, शिक्षक पतीसोबत राहणेही सुरू अन्‌ कोर्टात म्‍हणे पोटगी हवी!, युवतीसह तिच्या पित्‍याविरुद्ध गुन्हा दाखल, छ. संभाजीनगरातील घटना

Next Post

लाचखोर अप्पर तहसीलदार नितीन गर्जे अद्याप फरारीच!, पदभार चौधरींकडे

Next Post

लाचखोर अप्पर तहसीलदार नितीन गर्जे अद्याप फरारीच!, पदभार चौधरींकडे

हॉटेलमधून घरी परतताना आचाऱ्यावर काळाचा घाला; करमाडजवळ भीषण अपघात

हॉटेलमधून घरी परतताना आचाऱ्यावर काळाचा घाला; करमाडजवळ भीषण अपघात

गावगाडा सुरळीत ठेवणारे १६०९ ग्रा. पं. कर्मचारी २ महिन्यांपासून वेतनाविना!; कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ, उसनवारी करून जगण्याची सुरू आहे कसरत…छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुर्दैवी चित्र

गावगाडा सुरळीत ठेवणारे १६०९ ग्रा. पं. कर्मचारी २ महिन्यांपासून वेतनाविना!; कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ, उसनवारी करून जगण्याची सुरू आहे कसरत…छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुर्दैवी चित्र

Recent News

लग्‍न ठरल्याने प्रियकरासोबत तरुणीची बोलचाल बंद, त्‍याने तिचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल, ती अल्पवयीन असल्यापासून दोघांत होते शरीरसंबंध

लग्‍न ठरल्याने प्रियकरासोबत तरुणीची बोलचाल बंद, त्‍याने तिचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल, ती अल्पवयीन असल्यापासून दोघांत होते शरीरसंबंध

June 20, 2025
हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याची मुदत आता १५ ऑगस्टपर्यंत!, छ. संभाजीनगरात आजपर्यंत ६० हजार वाहनांनाच नंबर प्लेट

हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याची मुदत आता १५ ऑगस्टपर्यंत!, छ. संभाजीनगरात आजपर्यंत ६० हजार वाहनांनाच नंबर प्लेट

June 20, 2025
लाडसावंगीत ४ दुकाने फोडली, पण चोरी काही नाही गेले…व्यापारी असं पोलिसांना का म्हणाले…

लाडसावंगीत ४ दुकाने फोडली, पण चोरी काही नाही गेले…व्यापारी असं पोलिसांना का म्हणाले…

June 20, 2025
५ सोप्या पद्धती… विजेच्या वेगाने चालेल मोबाइल इंटरनेट

५ सोप्या पद्धती… विजेच्या वेगाने चालेल मोबाइल इंटरनेट

June 20, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN