- Marathi News
- जिल्हा न्यूज
- कन्नड सेक्स रॅकेटची फुल स्टोरी : गंगापूर, छत्रपती संभाजीनगरहून महिलांना बोलावून आंटीचा सुरू होता ग...
कन्नड सेक्स रॅकेटची फुल स्टोरी : गंगापूर, छत्रपती संभाजीनगरहून महिलांना बोलावून आंटीचा सुरू होता गोरखधंदा!; पैशांचे आमिष दाखवून गरजवंत महिलांना हेरायची…
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्नड शहरात ५० वर्षांची महिला बिनदिक्कत सेक्स रॅकेट चालवत होती. गरजवंत महिलांना हेरून कन्नडमध्ये आणत होती. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होती. विशेष म्हणजे, कन्नड शहर पोलिसांना या सेक्स रॅकेटची खबरबातही आजवर लागली नाही. छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांचे पथक गेले आणि कारवाई करून कुख्यात आंटीला ताब्यात घेतले. तिच्यासह वेश्या गमनासाठी आलेल्या […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्नड शहरात ५० वर्षांची महिला बिनदिक्कत सेक्स रॅकेट चालवत होती. गरजवंत महिलांना हेरून कन्नडमध्ये आणत होती. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होती. विशेष म्हणजे, कन्नड शहर पोलिसांना या सेक्स रॅकेटची खबरबातही आजवर लागली नाही. छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांचे पथक गेले आणि कारवाई करून कुख्यात आंटीला ताब्यात घेतले. तिच्यासह वेश्या गमनासाठी आलेल्या एका युवकालाही या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले. ही धडाकेबाज कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने कन्नडमध्ये सोमवारी (२८ एप्रिल) दुपारी अडीचला केली.
सोमवारी सकाळी ११ला प्रभारी पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह प्रभारी यांना गोपनीय माहिती मिळाली की, कन्नड शहरात अलका श्याम झोडगे (वय ५०, रा. नरसिंगपूर कन्नड) ही महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिला बोलावून घेऊन पुरुषांना शरीरसंबंध ठेवण्यासाठी उपलब्ध करून देते. त्यातून प्राप्त पैशांच्या वाटणीचे पीडित महिलांना आमिष दाखवते आणि वेश्याव्यवसाय करवून घेते. ही माहिती मिळाल्याने अन्नपूर्णा सिंह यांनी सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर कोमल शिंदे यांनी छाप्याचे नियोजन केले. पोलीस अंमलदार राजपूत, तडवी, श्रीमती चव्हाण, जारवाल यांना सोबत घेतले. चारचाकी वाहनातून पथक पंच आणि बनावट ग्राहकाला घेऊन कन्नडला धडकले. नरसिंगपूर गाठल्यानंतर अलका झोडगे हिच्या घराजवळील साधनाताई पाटील शाळेच्या मोकळ्या मैदानात पोलीस पथक थांबले. त्यानंतर बनावट ग्राहकाला अलकाच्या घराकडे विश्वशांतीनगरात पाठविण्यात आले.
बनावट ग्राहकाने अलकाच्या घराजवळील गायीच्या गोठ्यात प्रवेश केला. तेथे अलका झोडगे हिच्याशिवाय सुमारे ३० वर्षे वय असलेली पांढरी साडी घातलेली महिला, दुसरी सुमारे ४० वर्षे वय असलेली नारंगी रंगाची साडी घातलेली महिला दिसून आली. त्यापैकी पांढरी साडी घातलेल्या महिलेची मागणी बनावट ग्राहकाने शरीरसंबंधासाठी केली. अलकाने होकार दिला. त्यानंतर बनावट ग्राहकाने पैसे दिले. ते अलकाने जवळील पाकिटात ठेवले. त्यानंतर पांढरी साडी घातलेल्या महिलेला इशारा करून अलकाने बनावट ग्राहकासोबत जाण्यास सांगितले. त्याचदरम्यान बनावट ग्राहकाने गोठ्याबाहेर येऊन हाताने पोलिसांना इशारा केला. दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी पोलिसांनी या कुंटणखान्यावर हल्लाबोल केला. उत्तरमुखी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश केला.
दोन्ही खोल्यांचे दार वाजवून सर्वांना बाहेर बोलावले. पांढऱ्या साडीतील ३० वर्षीय महिला अर्धनग्न अवस्थेत खोलीत मिळून आली. खोलीतून अर्धवट फाडलेले कंडोमचे पाकीट गादीजवळ मिळून आले. महिलेला तिचे नाव, गाव विचारले असता ती गंगापूरची असल्याचे समोर आले. दुसरी नारंगी साडीवाली ४० वर्षीय महिला जी एका दुसऱ्या पुरुषासोबत बाजूच्या पत्र्याच्या खोलीत मिळून आली. ती छत्रपती संभाजीनगरच्या मयूर पार्क भागातील रहिवासी निघाली. तिच्यासोबत आढळलेल्या पुरुषाचे नाव वसंत श्यामराव राठोड (वय ३१, रा. घुसूर तांडा, ता. कन्नड) याला पकडण्यात आले. तिच्याही खोलीत कंडोमचे पाकीट गादीजवळ मिळून आले.
झडतीत ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त
अलका झोडगेची झडती घेतली असता तिच्याकडे ३ हजार रुपये रोख, लावा कंपनीचा ५०० रुपयांचा मोबाइल, पीडित ३२ वर्षीय गंगापूरच्या महिलेकडे ५०० रुपयांचा मोबाइल, दुसऱ्या ४० वर्षीय छत्रपती संभाजीनगरच्या महिलेकडे ७ हजार रुपयांचा मोबाइल मिळून आला. तिच्यासोबत आढळलेल्या वसंत राठोडकडे १ हजार रुपये रोख, ७ हजार रुपयांचा मोबाइल आणि ३५ हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. दोन वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या महिलांची सुटका करून पोलिसांनी कुंटणखाना चालविणारी अलका झोडगे व वेश्यागमन करताना मिळून आलेला पुरुष वसंत राठोड यांना ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चांद मेंदके करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पैठणमध्ये मनोज जरांगेंविरोधात पोस्ट टाकणाऱ्याला काळे फासले, कपडे फाडले !
भिक मागणारी १५ वर्षीय मुलगी गायब!, सिटी चौक पोलिसांकडून शोध सुरू
Latest News
