Monday, May 12, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home सिटी क्राईम

खासगी सावकारांचा कहर : अख्ख्या कुटुंबाचे अपहरण करून डांबले, मुलीवर बलात्‍काराची धमकी देत पित्‍याला बेदम मारहाण, पोलिसांनी सिनेस्‍टाइल केली सुटका!; वाळूज महानगरातील थरार

बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

वाळूज महानगर (संजय निकम : सीएससीएन वृत्तसेवा) : व्हीआयपींच्या बंदोबस्तात दिवसभर तैनात असलेल्या वाळूज एमआयडीसी पोलिसांना रविवारी (२७ एप्रिल) सायंकाळी आव्हानात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. दिवसभराचा थकवा बाजूला ठेवून पोलीस तत्‍परतेने एका कुटुंबाच्या मदतीला धावून गेले. छत्रपती संभाजीनगरच्या खासगी सावकारांनी एका कुटुंबाचे अपहरण करून त्‍यांना वाळूज महानगरातील एका बांधकाम साईटवर नेऊन डांबले होते. पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करून या कुटुंबाची सुटका केली. दोन सावकार आणि त्‍यांच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्या.

काय आहे प्रकरण…
सुरेश रामभाऊ घाटूळ ( वय ३८, रा. मूळगाव टाकळी कुंभकर्णी ता. जि. परभणी, ह. मु.आदर्श कॉलनी वाळूज महानगर १, छत्रपती संभाजनगर) यांचा मुकुंदवाडी परिसरातील हनुमाननगरात किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. त्यांनी परिसरातील खासगी सावकार वैभव बिहारीलाल जैस्वाल, प्रशांत विलास डांगे यांच्याकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती. ही रक्कम वाढत जाऊन ती फेडणे नंतरच्या काळात अशक्‍य झाले. त्‍यामुळे घाटुळे हे कुटुंबासह राहते घर व किराणा दुकान सोडून वाळूज महानगरातील आदर्श कॉलनीत दोन दिवसांपूर्वीच राहायला आले होते. खासगी सावकार वैभव जैस्वाल, प्रशांत डांगे व त्‍यांचे साथीदार गणेश लक्ष्मण डगळे, ओमकार कैलास पोपळघट, कुणाल विजय पोपळघट, परिघाबाई डांगे, जयश्री जैस्वाल हे घाटूळ यांचा पत्ता शोधत-शोधत शुक्रवारी वाळूज महानगरात दाखल झाले.

घर शोधलेच…
खासगी सावकार साथीदारांसह घर शोधून घरात घुसले आणि धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आमचे पैसे परत करा. नाही तर आज तुम्हाला आम्ही जीवंत मारून टाकू. तुमच्या दोन्ही मुलींवर बलात्कार करू, अशा धमक्या देत होते. गोंधळ वाढत चालल्याने नागरिक जमण्याच्या भीतीने हे टोळके सुरेश घाटूळे, १५ वर्षांची मुलगी, १३ वर्षांचा मुलगा यांना बळजबरीने कारमध्ये टाकू लागले. याचवेळी घाटुळे यांची १७ वर्षांची मुलगी त्यांच्या तावडीतून निसटून पळून गेली आणि परिसरातील एका मंदिरात लपून बसली. खासगी सावकारांनी घाटूळ कुटुंबाला त्यांच्या बांधकाम साईटवर आणून बेदम मारहाण केली. घाटुळे यांच्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्‍न करू लागले.

मुलगी पोलीस ठाण्यात आली…
सावकाराच्या ताब्‍यातून सुटलेली घाटूळ यांची १७ वर्षांची मुलगी मंदिराच्या ओट्यावर रडत असल्याचे पाहून वाळूज महानगरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने विचारपूस केली. तिने कुटुंबाचे अपहरण झाल्याचे सांगितले. प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या मुलीला पोलीस ठाण्यात आणले. रात्री ८.४५ वाजता ते पोलीस ठाण्यात दाखल झाले. या वेळी पोलीस ठाण्यातील सर्वच पोलीस अंमलदार बंदोबस्ताच्या दिवसभराच्या थकव्यातून काहीसे निवांत झाले होते. मात्र मुलगी पोलीस ठाण्यात येताच ते पुन्हा अलर्ट मोडवर आले. त्‍यांनी मुलीला धीर दिला. त्‍याचवेळी अपहरणकर्त्यांचा मुलीच्या मोबाइलवर फोन आला आणि मुलीला आमच्या ताब्यात द्या, तेव्हाच त्यांच्या कुटुंबाची सुटका करू, अशी मागणी ते करू लागले.

पोलिसांनी सिनेस्‍टाइल केली सुटका…
पोलिसांनी त्यांच्या मागणीला होकार देताच त्या मुलीला घ्यायला दोन कार वाळूज महानगर परिसरात आल्या. पोलीस तात्काळ दोन खासगी गाड्यांतून अपहरणकर्ते असलेल्या ठिकाणी जाऊन धडकले. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा अपहरणकर्त्यांनी घाटूळ यांना बेदम मारहाण करून अर्धमेले केले होते. पोलिसांना वेळ झाला असता तर कदाचित घाटुळे जिवंत राहिले नसते. पोलिसांनी अपहरणकर्त्यांना अत्यंत गुप्त नियोजन करून सिनेस्टाईल ताब्यात घेत मुसक्या आवळल्या. अपहृत कुटुंबाची रात्री ९.४५ वाजता सुटका केली. ही धडाकेबाज कारवाई वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, अंमलदार बाळासाहेब आंधळे, किशोर साबळे आदींनी पार पाडली. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

मनुष्यबळ कमी तरीही कामगिरी यशस्वी…
गेल्या काही दिवसांपासून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना छत्रपती संभाजीनगरात व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी जावे लागत आहे. त्यातच अपहरणाचे प्रकरण पोलीस ठाण्यात येताच पोलिसांनी यशस्वी नियोजन करून कमी मनुष्यबळ असतानाही अपहरणकर्त्याच्या जीवाला कोणत्याच प्रकारची इजा न होऊ देता सहा अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या.

Previous Post

भाचा पाहुणा म्हणून आला अन्‌ मामाची अल्पवयीन मुलगी पळवली!; मुकुंदनगरातील घटना

Next Post

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटात खुपसला चाकू, युवकाची प्रकृती गंभीर, मिलिंदनगरातील घटना

Next Post
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटात खुपसला चाकू, युवकाची प्रकृती गंभीर, मिलिंदनगरातील घटना

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटात खुपसला चाकू, युवकाची प्रकृती गंभीर, मिलिंदनगरातील घटना

महत्त्वाची बातमी : पैठण येथील श्रीमहानुभाव दत्त मंदिर विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता

महत्त्वाची बातमी : पैठण येथील श्रीमहानुभाव दत्त मंदिर विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता

आरटीओ, घाटीच्या डॉक्‍टरांना हाताशी धरून बनवेगिरी; पतीच्या मृत्‍यूनंतर अलिशान गाड्या पत्‍नीकडे येण्याऐवजी गेल्या दीर, सासऱ्याकडे!; छ. संभाजीनगरातील प्रकार

आरटीओ, घाटीच्या डॉक्‍टरांना हाताशी धरून बनवेगिरी; पतीच्या मृत्‍यूनंतर अलिशान गाड्या पत्‍नीकडे येण्याऐवजी गेल्या दीर, सासऱ्याकडे!; छ. संभाजीनगरातील प्रकार

Recent News

रुद्र हॉटेलच्या मालकावर हल्ला, तिसगाव रोडवरील घटना, बेदम मारहाण करून हल्लेखोर गेले पळून…

तीक्ष्ण वस्‍तूने वार करून तरुणाला केले जखमी, तिघांचे कृत्‍य, समतानगरातील घटना

May 12, 2025
विटभट्टीवर काम करणाऱ्या दाम्‍पत्‍याची १५ वर्षीय मुलगी बेपत्ता, आईची वाळूज पोलिसांत तक्रार

शिवशंकर कॉलनीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

May 12, 2025
शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

May 12, 2025
बांधकाम कंत्राटदार अमोल पवार, बाळासाहेब पवार, तेजस्वी पवार निघाले फ्रॉड!; रुग्णालय बांधकामासाठी पावणेदोन कोटी घेतले, बांधकामाचा पत्ता नाही, वरून धमक्या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मदरशातून दोन मुलांचे अपहरण झाल्याने खळबळ

May 12, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |