Saturday, June 21, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home सिटी डायरी

अक्षय तृतीयेचा मुहूर्त : बालविवाह विरोधी पथके सतर्क; जवळपास होणाऱ्या बालविवाहांची माहिती कळविण्याचे प्रशासनाचे आवाहन

बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अक्षयतृतीया हा सण बुधवारी (३० एप्रिल) आहे. या मुहूर्तावर अनेक विवाह होत असतात. त्यात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी जिल्हा, तालुका व गावस्तरावरील शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे, असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणांना दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण लक्षात घेता बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाने बालविवाह निर्मूलन कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात बालविवाह रोखण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. १ एप्रिल २०२४ ते आजपर्यंत एकूण ८८ बालविवाह या कृती दलामार्फत थांबविण्यात आले आहेत. चार प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशान्वये जिल्ह्यामध्ये बालविवाह निर्मूलनासाठी विविध जाणीव जागृतीपर उपक्रम घेऊन जनसामान्यांमध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ या कायद्याची जाणीवजागृती व्हावी व बाल वयात बाल हक्कांपासून बालके वंचित राहू नयेत यासाठी सर्व संबंधित यंत्रणाच्या समन्वयाने कार्यवाही करण्याचे कामकाज सुरू आहे.

दरम्यान या महिन्यात बुधवारी असणाऱ्या अक्षय तृतीया या सणाच्या शुभ मुहूर्तावर अनेक बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सगळे बालविवाह रोखण्याकरिता जिल्ह्यातील तालुका व गावस्तरावरील शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे, असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम२००६ या कायद्यान्वये मुलीचे वय १८ वर्षे व मुलाचे वय २१ वर्षांच्या आत असताना विवाह केला तर असा विवाह बालविवाह म्हणून गणला जातो. असा विवाह केल्यास आयोजकांना अधिनियमानुसार एक लाख रुपये आर्थिक दंड व दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद किंवा दोन्ही शिक्षेचे प्रावधान आहे. तसेच ६ जून २०१३ (सुधारित २१.१०.२०२२) च्या शासन अधिसूचनेनुसार ग्रामपंचायतीसाठी ग्रामसेवक व १८ ऑगस्ट २०१६ (सुधारित २१.१०.२०२२) च्या अधिसूचनेनुसार नागरी भागाकरिता बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून घोषित केले आहेत.

जिल्ह्यामध्ये कोठेही बालविवाह होत असतील किंवा होऊ घातले असतील तर नागरिकांनी अशी माहिती चाइल्ड हेल्प लाइन १०९८ तसेच ११२ या मोफत हेल्प लाईन नंबरवर फोन करून द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. आपल्या नजिक होत असलेल्या बालविवाहाची माहिती नजीकचे पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे देखील तात्काळ संपर्क साधून द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती रेश्मा चिमंद्रे यांनी केले आहे.

Previous Post

कारच्या पार्किंगसाठी शेजाऱ्याने अर्ध्याहून अधिक रस्ता व्यापला, इकडची गाडी तिकडं जाईना अन्‌ तिकडची इकडं येईना!; पोलिसांकडे जाऊनही उपयोग होईना!!, उत्तमनगरातील रहिवासी वैतागले

Next Post

भाचा पाहुणा म्हणून आला अन्‌ मामाची अल्पवयीन मुलगी पळवली!; मुकुंदनगरातील घटना

Next Post

भाचा पाहुणा म्हणून आला अन्‌ मामाची अल्पवयीन मुलगी पळवली!; मुकुंदनगरातील घटना

खासगी सावकारांचा कहर : अख्ख्या कुटुंबाचे अपहरण करून डांबले, मुलीवर बलात्‍काराची धमकी देत पित्‍याला बेदम मारहाण, पोलिसांनी सिनेस्‍टाइल केली सुटका!; वाळूज महानगरातील थरार

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटात खुपसला चाकू, युवकाची प्रकृती गंभीर, मिलिंदनगरातील घटना

Recent News

लग्‍न ठरल्याने प्रियकरासोबत तरुणीची बोलचाल बंद, त्‍याने तिचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल, ती अल्पवयीन असल्यापासून दोघांत होते शरीरसंबंध

लग्‍न ठरल्याने प्रियकरासोबत तरुणीची बोलचाल बंद, त्‍याने तिचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल, ती अल्पवयीन असल्यापासून दोघांत होते शरीरसंबंध

June 20, 2025
हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याची मुदत आता १५ ऑगस्टपर्यंत!, छ. संभाजीनगरात आजपर्यंत ६० हजार वाहनांनाच नंबर प्लेट

हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याची मुदत आता १५ ऑगस्टपर्यंत!, छ. संभाजीनगरात आजपर्यंत ६० हजार वाहनांनाच नंबर प्लेट

June 20, 2025
लाडसावंगीत ४ दुकाने फोडली, पण चोरी काही नाही गेले…व्यापारी असं पोलिसांना का म्हणाले…

लाडसावंगीत ४ दुकाने फोडली, पण चोरी काही नाही गेले…व्यापारी असं पोलिसांना का म्हणाले…

June 20, 2025
५ सोप्या पद्धती… विजेच्या वेगाने चालेल मोबाइल इंटरनेट

५ सोप्या पद्धती… विजेच्या वेगाने चालेल मोबाइल इंटरनेट

June 20, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |