छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जयदुर्गा हौसिंग सोसायटी गारखेडा ते तिरुमला मंगल कार्यालय असा २४ मीटर रुंद रस्ता शहर विकास आराखड्यात आहे. मात्र या रस्त्यामुळे १६०० घरे पाडावी लागून एवढी कुटुंबं विस्थापित झाली असती. मंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून रस्ता रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर त्यांना यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शहर विकास आराखड्यातील हा रस्ता रद्द केला आहे. या रस्त्यामुळे नागरिकांच्या रोजीरोटीवर परिणाम होणार होता. या रस्त्याला दुसऱ्या रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे.