छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना २० तारखेपूर्वी सरकारचे शिष्टमंडळ भेटणार असून त्यांनी केलेल्या मागण्यांबद्दल सरकारची भूमिका सकारात्मक आहे, अशी स्पष्टोक्ती आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मनोज जरांगे यांना माहीत आहे की मुख्यमंत्री काम करत आहेत. कुणी कुणावर दबाव आणत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्द पाळणारे आहेत.ज्या ५७ लाख नोंदी सापडल्या, त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळेच सापडल्या आहेत. सापडलेल्या नोंदी रद्द होणार नाहीत. थोडा वेळ मागे पुढे होत आहे, पण जरांगे यांच्या मागण्यांबद्दल सरकारकडून सकारात्मक हालचाली सुरू आहेत, असे शिरसाट म्हणाले. छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर मी प्रतिक्रिया देणार नाही. त्यांनी काय बोलावे तो त्यांचा प्रश्न आहे, असे आमदार शिरसाट म्हणाले.