छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल उद्या, १९ फेब्रुवारीला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे : सायंकाळी ६ वा. ४० मि. नी. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन, सायं.६ वा. ५० मि.नी. शेंद्रा औद्योगिक वसाहतीकडे प्रयाण, सायं.सव्वा सात वा. ऑरिक शेंद्रा औद्योगिक वसाहतीत भेट, रात्री ८ वा. स्थानिक, राज्य व राष्ट्रीयस्तरावरील उद्योग संघटना आणि चेंबर्स यांच्याशी संवाद, स्थळ : ऑरीक हॉल, शेंद्रा औद्योगिक वसाहत. रात्री १० वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे मुक्काम व राखीव. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. पत्रकार परिषद, स्थळः हॉटेल रामा इंटरनॅशनल. सकाळी साडेनऊ वा. वेरुळ लेण्यांकडे प्रयाण, सकाळी साडेदहा ते दुपारी १२ वेरुळ लेण्यांची पाहणी, दुपारी १२ वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, तेथून हेलिकॉप्टरने दिघी पोर्ट औद्योगिक वसाहतीकडे रवाना.