इलियाना डिक्रूझने हिने ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याचे संकेत दिले आहेत. इलियानाने एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये ती प्रेग्नन्सी टेस्ट स्ट्रिप्स दाखवताना दिसली आणि त्यासोबत लिहिले – ऑक्टोबर.

इलियाना ३८ वर्षांची असून, यावर्षी ती दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार असं दिसतंय. दीड वर्षापूर्वी १ ऑगस्ट २०२३ रोजी इलियानाने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. या मुलाचे नाव कोआ फिनिक्स डोलन ठेवले. ती अनेकदा तिच्या मुलाची झलक इंस्टाग्रामवर शेअर करत असते. शनिवारी इलियानाने गरोदर असल्याची पुष्टीही केली. इलियानाच्या जोडीदाराचे नाव मायकल डोलन आहे. त्यांनी २०२३ मध्ये गुपचूप लग्न केले होते. मात्र लग्नाबद्दल अजूनही त्यांनी स्पष्ट सांगितलेले नाही. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, इलियाना शेवटची दो और दो प्यार या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसली होती. विद्या बालन, प्रतीक गांधी आणि सेंथिल रामामूर्ती यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही. सध्या इलियाना चित्रपटांपासून दूर असून, तिचे खासगी आयुष्य एन्जॉय करत आहे.