ठग सुकेश चंद्रशेखरने पुन्हा एकदा व्हॅलेंटाईन डेनिमित्त बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला एक रोमँटिक पत्र लिहिले आहे. पत्रात, सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला प्रेमाने बेबी गर्ल असे संबोधले आणि तिच्यावरील आपले प्रेम व्यक्त केले.
सुकेशने लिहिले, बेबी गर्ल, सर्वप्रथम मी तुला व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा देतो, प्रिये, या वर्षाची सुरुवात आपल्यासाठी खूप सकारात्मकता आणि खूप खास गोष्टींनी झाली आहे आणि हा व्हॅलेंटाईन डे देखील खूप खास आहे. कारण तो आपल्या आयुष्यातील उर्वरित व्हॅलेंटाईन डे एकत्र घालवण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.’ सुकेशने या पत्रात पुढे लिहिले आहे की, बेबी, मी पुढे काही बोलण्यापूर्वी, मला एक क्षण सांगायचे आहे, जॅकी, मी तुला खरोखर खूप प्रेम करतो, तू जगातील सर्वोत्तम व्हॅलेंटाईन आहेस, मी तुला वेड्यासारखे प्रेम करतो.’ सुकेश पुढे म्हणाला की, या खास प्रसंगी मी तुला एक खाजगी जेट भेट देत आहे. तुझ्या नावाची पहिली अक्षरे जेटवर लिहिलेली आहेत. सुकेशने असा दावाही केला की जेटचा नोंदणी क्रमांक देखील जॅकलिनची जन्मतारीख आहे.
या पत्रात सुकेशने पुढे लिहिले की, बाळा, तू नेहमीच कामाच्या शूटिंगसाठी जगभर उडत राहतेस, आता या जेटमुळे, तुझ्या आवडीनुसार आणि सोयीनुसार तुझा प्रवास खूप सोपा होईल.’ पत्राचा शेवट असा केला आहे, की “बेबी या व्हॅलेंटाईन डेला माझी फक्त एकच इच्छा आहे, जर मी पुन्हा जन्माला आलो तर मला तुझ्या हृदयाच्या रूपात जन्म घ्यायचा आहे. जेणेकरून मी तुझ्या आत धडधडत राहू शकेन. मी या ग्रहावरील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे. मला या आयुष्यातील सर्वात सुंदर व्यक्ती तू, माझा व्हॅलेंटाईन म्हणून सापडली. सुकेश चंद्रशेखर सुमारे २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात दिल्लीतील मंडोली तुरुंगात बंदिस्त आहे. अनेकदा खास प्रसंगी, तुरुंगातून सुकेशचे जॅकलीनला लिहिलेले प्रेमपत्र उघड होते. तथापि, जॅकलिनने सुकेशसोबत कोणत्याही प्रेमसंबंधाचा इन्कार केला आहे.