मुंबई : अभिनेता अक्षय कुमार हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. तो सर्वाधिक करदेखील भरतो. २०२२ मध्ये करदात्यांच्या यादीत तो अव्वल स्थानावर होता. त्याने सुमारे २९.५ कोटी रुपये कर भरला होता. त्याच्याकडेही अनेक मालमत्ता आहेत. त्याने अलीकडेच मुंबईतील वरळी येथील त्याचा अलिशान फ्लॅट कोट्यवधी रुपयांना विकला आहे.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्याकडे केवळ भारतातच नाही तर परदेशातही अनेक मालमत्ता आहेत. त्याचा वरळीतील ३६० वेस्ट टॉवरच्या बी विंगच्या ३९ व्या मजल्यावर फ्लॅट होता. तो ६,८३० चौरस फुटांचा होता. त्यात ४ कार पार्किंगची सुविधा होती. ३१ जानेवारी रोजी तो ८० कोटी रुपयांना विकला गेला आहे. या व्यवहारासाठी ४.८ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी देखील भरण्यात आली आहे.
अक्षय कुमारने ७८% नफा कमावला
काही आठवड्यांपूर्वीच अक्षयने बोरिवली पूर्वेतील त्याचा फ्लॅट ४.२५ कोटी रुपयांना विकला होता. अभिनेत्याने हा फ्लॅट २०१७ मध्ये २.३७ कोटी रुपयांना घेतला होता. जेव्हा त्याने तो विकला तेव्हा त्याला ७८ टक्के नफा झाला. सध्या तो जुहू येथील त्याच्या आलिशान समुद्रकिनारी असलेल्या अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये पत्नी आणि मुलांसह राहतो. अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा स्कायफोर्स चित्रपटात वीर पहाडिया, निमरत कौर आणि सारा अली खानसोबत दिसला होता. याशिवाय तो वेलकम टू जंगल, हेरा फेरी ३ आणि भूत बंगलामध्ये दिसणार आहे. तो सध्या चित्रपटांचे शूटिंग करत आहे.