छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आरोग्य, पैसे, नाते, स्मरणशक्ती अशा कोणत्याही समस्यांवर संमोहनशक्तीतून उपचार शोधणारा ‘मन की शक्तीयों का महासेमीनार’ शनिवार (८ फेब्रुवारी) व रविवार (९ फेब्रुवारी) या दोन दिवशी शहरातील तापडिया नाट्यमंदिरात होणार आहे. या कार्यशाळेसाठी प्रवेश मोफत असला तरी नावनोंदणी मात्र आधी गरजेचे आहे. त्यासाठी इच्छुकांनी 9850170936 या नंबरवर कॉल करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्ट्रेस, डिप्रेशन, निद्रानाश, ओसीडी या समस्यांवर ही कार्यशाळेतून मोठा फायदा होतो. या कार्यक्रमातून जीवन यशस्वी आणि आनंदी झाल्याचे अनुभव अनेकांनी व्यक्त केले आहेत. दहावी, बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठीसुद्धा ही कार्यशाळा लाभदायी ठरणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खास ब्रेन प्रोग्रामींगद्वारे ॲडीक्शनपासून सुटका करून अभ्यासाची आवड निर्माण करणे, परीक्षेची भीती घालवणे, नैराश्यातून आशादायकतेकडे नेणे, स्मरणशक्तीची २० सूत्रे दिली जातात. ज्याद्वारे संपूर्ण पुस्तक लक्षात ठेवता येते. विद्यार्थ्यांसोबत पालकांनी येणे आवश्यक आहे. व्यसनाधिनता, मानसिक समस्यांवरही अत्यंत उपयुक्त कार्यशाळा आहे.