चोरट्यांचं नशीबच खराब… मोबाइल हिसकावून पळताना स्‍कुटी स्लीप झाली, लोकांनी पकडून तिघेही पोलिसांच्या ताब्‍यात दिले!!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हॉटेलचे आटोपून घरी परतणाऱ्या वेटरचा तिघा स्‍कुटीस्वारांनी मोबाइल हिसकावला, पण पळताना स्‍कुटी स्लीप होऊन तिघेही रस्त्यावरच पडले. लोकांनी त्‍यांना पकडून जिन्सी पोलिसांच्या ताब्‍यात दिले. ही घटना रविवारी (२ फेब्रुवारी) पहाटे दीडच्या सुमारास (मध्यरात्री) सिडको एन ७ मध्ये घडली. प्रविण प्रल्हाद उनवणे (वय २४, अयोध्यानगर, सिडको एन ७, गणेश पाटील यांच्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हॉटेलचे आटोपून घरी परतणाऱ्या वेटरचा तिघा स्‍कुटीस्वारांनी मोबाइल हिसकावला, पण पळताना स्‍कुटी स्लीप होऊन तिघेही रस्त्यावरच पडले. लोकांनी त्‍यांना पकडून जिन्सी पोलिसांच्या ताब्‍यात दिले. ही घटना रविवारी (२ फेब्रुवारी) पहाटे दीडच्या सुमारास (मध्यरात्री) सिडको एन ७ मध्ये घडली.

प्रविण प्रल्हाद उनवणे (वय २४, अयोध्यानगर, सिडको एन ७, गणेश पाटील यांच्या घरात किरायाने) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो मोगल दरबार हॉटेलमध्ये एक वर्षापासून वेटर आहे. शनिवारी दुपारी दोनला तो कामावर आला. दिवसभर काम करून रात्री हॉटेलची साफसफाई करून मध्यरात्रीनंतर सव्वाला घरी निघाला. पायी येत असताना सिडको एन ७ मध्ये बाबा ब्रेकरसमोरून जात असताना मध्यरात्री दीडच्या सुमारास मागून विटकरी रंगाची ॲक्टिव्हावर (MH 20 EX 6830) बसून तीन मुले आली. त्यांनी प्रविणच्या जवळून जात त्‍याच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला.

ते पळुन जात असताना के. के. पेट्रोलपंपासमोर सावरकर चौक रोडवर त्‍यांची स्कुटी स्लीप होऊन तिघेही रोडवर पडले. प्रविणने आरडाओरडा केल्याने लोक जमा झाले. लोकांनी स्‍कुटीवरील करण दिलीप जाधव, अभिजीत नानासाहेब सुरडकर (रा. त्रिवेणीनगर चिकलठाणा) यांना पकडून ठेवले. अभय (रा. रामनगर) पळून गेला. प्रविणने हॉटेलमालक अप्पू मुजीम खान यांना सांगितले असता त्‍यांनी पोलिसांना डायल ११२ वर कॉल केला व त्या दोघांना घेऊन पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी तिन्ही चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार गजानन मांटे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे

Latest News

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software