फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील लहानेवाडी फाट्यावर अनिकेत हॉटेलसमोर शुक्रवारी (५ जुलै) सायंकाळी सहाच्या सुमारास एका ४० वर्षीय महिलेने दारू नशेच्या विवस्त्र होत तासभर गोंधळ घातला. हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. अनेक वाहनधारकांनी वाहन थांबवून ‘गोंधळ’ पाहिला. फुलंब्री पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी सांगितले, की जालना जिल्ह्यातील महिला पतीसोबत फुलंब्रीच्या लहानेवाडी फाट्यावरील (सिल्लोड रोड) एका हॉटेलवर कामाला आहे. शुक्रवारी सायंकाळी तिने दारू पिली आणि कपडे उतरवून रस्त्यावर आली. तासभर ती त्याच अवस्थेत रस्त्यावर गोंधळ घालत होती. हातवारे करून ती काहीतरी म्हणत होती. तिचा हा धिंगाणा पाहण्यासाठी अनेकांनी गाड्या थांबवल्या. या प्रकाराची माहिती फुलंब्री पोलिसांना कळताच महिला पोलिसांना घटनास्थळी पाठवून तिला ताब्यात घेण्यात आले. फुलंब्री पोलीस ठाण्यात तिला आणल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात तिने दारू पिल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.