छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रसिद्ध संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांची कार्यशाळा दर आठवड्यात शनिवार, रविवारी छत्रपती संभाजीनगरातील तापडिया नाट्य मंदिरात सायंकाळी सातला होत असते. या कार्यशाळेत सहभागी होणारे त्यांच्या त्रासातून मुक्त होतात, तेव्हा अनुभव व्यक्त करतात. त्यांचे अनुभव ऐकून कुणीही थक्क होईल. एका व्यक्तीच्या मुलात अचानक विचित्र हालचाली सुरू झाल्या होत्या. कधी तो मध्येच हात हलवे, कधी पाय तर कधी त्याला उचक्या यायला सुरू व्हायच्या तर त्या थांबता थांबत नव्हत्या. डॉक्टरांकडे लाखो रुपये खर्च करूनही उपयोग शून्य…डॉक्टरांनी आजाराचे निदान केले, पण उपचाराला मुलगा काही साथ देईना, दोनच दिवस तो नांदेडकर यांच्या कार्यशाळेत सहभागी झाला अन् त्याच्यात झालेला बदल आश्चर्यचकीत करणारा ठरला. त्याच्या वडिलांनी हा अनुभव गेल्या आठवड्यात सांगितला…
पहा व्हिडीओ :
एस. के. नांदेडकर यांच्या शनिवार, रविवारी होणाऱ्या कार्यशाळेत प्रवेश मोफत असतो. मात्र त्यासाठी नावनोंदणी अनिवार्य असते. या आठवड्यातही शनिवार, रविवारी सायंकाळी सात ते नऊदरम्यान कार्यशाळा तापडिया नाट्यगृहात होणार आहे. त्यासाठी प्रवेश सुरू झाले असून, इच्छुक 9850170936 या नंबरवर कॉल करून सहभाग निश्चित करू शकतात. नातेसंबंधातील अडचण असो, की स्मरणशक्तीची, तणाव, निद्रानाश यासह कोणत्याही त्रासाला संमोहन कार्यशाळा लाभकारक ठरतेय, असे अनुभव सहभागींकडून व्यक्त होत आहेत. विद्यार्थ्यांसाठी खास ब्रेन प्रोग्रामींगद्वारे ॲडिक्शनपासून सुटका केली जाते. यातून त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण करणे, परीक्षेची भीती घालवणे, नैराश्यातून आशादायकतेकडे नेणे, स्मरणशक्तीची २० सूत्रेही शिकवली जातात.