छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : जिल्हा परिषद उपकर योजना सन 2023-24 वर्षाकरीता लाभ घटकांकरीता इच्छुक लाभार्थी शेतकऱ्यांकडून दि. 18 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज संबंधित पंचायत समिती कार्यालय, कृषी विभाग, जिल्हा परिषद येथे सादर करावे,असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे. योजना व लाभाची माहिती खालीलप्रमाणे-
- ओपनवेल विद्युत पंपसंच 5 एच.पी. देय अनुदान मर्यादा रक्कम प्रति नग रुपये किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त रु.10,500 च्या मर्यादेत.
- कडबा कुट्टी यंत्र 3 एच.पी. विद्युत मोटर सह देय अनुदान मर्यादा रक्क्म प्रति नग रुपये किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त रु.15,225 च्या मर्यादेत
- ताडपत्री 6X6 मीटर, 400 जीएसएम देय अनुदान मर्यादा रक्क्म प्रति नग रुपये किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त रु.1500 च्या मर्यादेत (जास्तीत जास्त 2 नग प्रती लाभार्थी मर्यादेत)
अटी व शर्ती - मंजूर झालेल्या घटकाची खरेदी डीबीटीद्वारे करणे बंधनकारक आहे.
- अर्जाद्वारे तयार होणारी पात्र निवड यादी दिनांक 31 मार्च 2025 पर्यंतच वैध राहील व त्यानंतर आपोआप रद्द होईल.
- केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी यंत्राचे रीतसर टेस्टिंग करुन ते बी.आय.एम.मानांकन (स्टँडर्ड) तांत्रिक निकषानूसार असेल याची खात्री करावी.
- मंजूर झालेले यंत्र, घटक खुल्या बाजारातून खरेदी करुन त्याचे मूळ देयक (Tax invoice) व टेस्ट रिपोर्ट सादर करणे लाभार्थ्यास बंधनकारक राहील.
- यंत्र, घटक खुल्या बाजारातून लाभार्थी स्वत:च्या पसंतीने खरेदी करणार असल्याने सदर यंत्र, घटकाच्या गुणवत्तेची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थीची राहील.
- योजनेतील इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पंचायत समिती कार्यालयात विहित मुदतीत सादर करावेत त्यांची निवड सोडत (लकी ड्रॉ) पद्धतीने केली जाईल.
- यंत्र, घटक सामग्रीची खरेदी पूर्वसंमती मिळाल्यानंतरच बंधनकारक राहील.
- मागणी केलेल्या यंत्राचा कुटुंबात यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ घेतला नसल्याबाबतचे तालुका कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
- मंजूर झालेल्या घटकाच्या खरेदीसाठी प्रदान केलेल्या पूर्वसंमतीची वैधता 30 दिवस असेल, त्यानंतर पूर्वसंमती आपोआप रद्द होईल.
आवश्यक कागदपत्रे - इच्छुक लाभार्थीच्या नावे अलीकडच्या काळातील 7/12 नमुना 8 अ,
- 7/12 वर विहिरीची नोंद बंधनकारक (विद्युत मोटर घटकासाठी),
- वीज जोडणी असणे बंधनकारक व त्याबाबतच्या पुराव्याची प्रत(विद्युत मोटार घटकासाठी.)
- आधार कार्डची प्रत,
- राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबूकची प्रत,
- मागासवर्गीय असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेल्या जात प्रमाणपत्राची प्रत,
- दिव्यांग असल्यास प्रमाणपत्राची प्रत,
- अर्जदार शेतकऱ्याकडे जनावरे असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला (कडबा कुट्टी यंत्र घटकासाठी)
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 18 ऑक्टोंबर 2024,अर्ज सादर करण्याचे स्थळ पंचायत समिती कार्यालय, कृषी विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर