छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : अकरावीच्या विद्यार्थ्याने रेल्वेसमोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात समोर आली आहे. रजत जयकुमार देवदानी (वय 17 रा. उत्तरानगरी, चिकलठाणा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (9 ऑक्टोबर) सकाळी आठच्या सुमारास घडली.
रजत वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होता. त्याच्या वडिलांचा फरसाणचा व्यवसाय आहे. सकाळी जॉगींगला जात असल्याचे रजत गेला होता. डेमो रेल्वेखाली त्याने आत्महत्या केली. मुकुंदवाडी पोलिसांनी रजतला घाटीत दाखल केले. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस तपास करत आहेत.