वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा ) : समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील खंबाळा गावाजवळ खासगी बसने कंटेनरला मागून धडक दिली. यात ट्रॅव्हल्समधील 24 प्रवासी जखमी झाले. ही घटना आज (9 ऑक्टोबर) सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू करण्यात आले. चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी आणले आहे.
खासगी बस हैदराबाहून शिर्डीला जात होती. खंबाळा शिवारात बस येताच शिर्डीच्या दिशेने जाणार्या कंटेनरला बसने मागून जोरात धडक दिली. यात बसचालकासह 24 प्रवासी जखमी झाले. वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी हलवले. बसचालकाला पहाटे डुलकी लागत होती. प्रवाशांनी त्याला अलर्टही केले होते. मात्र तरीही त्याने बस थांबवली नाही.