प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिक रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटी सीझन ३ मध्ये दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये तो त्याच्या दोन्ही पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिकसोबत सहभागी होत आहे. त्यांची लव्हस्टोरी ऐकून होस्ट अनिल कपूरही थक्क झाला. त्यांच्यासोबत एक खेळही त्याने खेळला. यात तिघांनीही अनेक मनोरंजक प्रश्नांची उत्तरे दिली. तिघांनीही सांगितले की ते या शोमध्ये का आले आहेत!
अरमान मलिक २०१७ पासून फिटनेस फॅमिली नावाचे YouTube चॅनल चालवत आहे, त्याचे ९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. २०२० मध्ये त्याने अरमान मलिक नावाचे दुसरे YouTube चॅनेल तयार केले, ज्याला २ दशलक्ष लोक फॉलो करतात. तो TikTok वरही खूप प्रसिद्ध झाला. मार्च २०११ मध्ये कामानिमित्त तो पायल शर्माला भेटला. दोघांनी एकमेकांना ६ दिवस डेट केले आणि ७व्या दिवशी पायलने घरातून पळून जाऊन अरमानशी लग्न केले. अरमान आणि पायलचे वैवाहिक जीवन चांगले चालले होते. दोघांना एक मुलगा झाला. पायलने तिची मैत्रिण कृतिका बसरा हिलाही तिच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित केले होते. पार्टीत ती पहिल्यांदा अरमानला भेटली होती. या भेटीनंतर त्यांनी बाहेर जाण्याचा प्लॅन केला, पण तो प्लान रद्द झाला आणि कृतिकाला पायलच्या घरी ६ दिवस राहावे लागले आणि ती अरमानच्या प्रेमात पडली. सातव्या दिवशी दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केले.
अरमानने सांगितले की, लग्नानंतर लगेचच त्याने पायलला लग्नाचा फोटो पाठवला. ते पाहून पायल थक्क झाली. त्यांचे नाते नवरा-बायकोपेक्षा मैत्रीचे होते. त्यामुळे पायलला वाटले की अरमान मस्करी करतोय, पण नंतर जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. पायलने सांगितले की, तिला हवे असते तर ती अरमानला सोडू शकली असती. पण संतापापेक्षा प्रेम वरचढ ठरले. अरमानने आपली सर्व संपत्ती आपल्या दोन्ही पत्नींच्या नावावर केल्याचेही त्याने सांगितले. अरमानने सांगितले, की तो या शोमध्ये आला आहे. कारण लोक म्हणतात की त्याचे दोन्ही पत्नींसोबतचे नाते खोटे आहे. तो रीलमध्ये आनंदी दिसत असेल, परंतु वास्तविक जीवनात असे नाही. काहींनी तर अरमानने कंटेंटसाठी दुसरे लग्न केल्याचा दावाही केला होता. त्यामुळेच या दाव्यांचे खंडन करण्यासाठी तो शोमध्ये आला आहे. त्यांच्या खऱ्या आयुष्यातही प्रेम आहे हे त्यांना दाखवायचे आहे. कृतिकाने स्टेजवर सांगितले, की तिच्या हातावर पायल आणि अरमानची नावे आहेत आणि पायलने अरमान आणि कृतिकाची नावेही टॅटू करून घेतली आहेत. तिघांनाही चार मुले आहेत. सर्वजण एकाच छताखाली प्रेमाने राहतात.