तुम्ही प्रेमात पडला आहात का? कदाचित तुम्ही प्रेमात पडला असाल, पण लक्षात येत नसेल… कारण तो ताप नाही जो थर्मामीटरने मोजता येतो ना भाजीत मीठ कळतं तसं लगेच लक्षात यायला. ही एक अतिशय खास भावना आहे जी तुम्हाला हळूहळू जाणवते. प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडतो. पण कुणाच्यातरी प्रेमात आपलं हृदय धडधडायला लागलंय हे कसं कळणार? फक्त तुमचा गोंधळ दूर करण्यासाठी, आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी आणि लक्षणांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला कळू शकेल की तुम्ही खरोखरच एखाद्याच्या प्रेमात पडला आहात…
विचारात हरवाल : एखादी व्यक्ती प्रेमात हरवून जाते. तुम्हीही त्या एखाद्या व्यक्तीच्या विचारात हरवून जात असाल, कोणाशीही बोलताना तिचाच विचार करत असाल तर तुम्ही प्रेमात पडले म्हणून समजा.
अस्वस्थ वाटणे : सर्वकाही जवळ असूनही तुम्हाला काहीतरी चुकल्यासारखे वाटते का? चांगला दिवस गेल्यावरही तुमचे मन उदास असते का? जर होय, तर हे निश्चित आहे की तुम्ही प्रेमात पडला आहात. जर तुमचे हृदय एखाद्यासाठी अस्वस्थपणा अनुभवत असेल तर तुम्ही खूप प्रेमात आकंठ बुडालेले आहात.
कल्पनाशक्ती निर्माण करणे : प्रेमात प्रत्येकासोबत घडणारी एक गोष्ट म्हणजे कल्पना करणे. जर तुम्ही एखाद्याबद्दल खूप विचार करायला सुरुवात केली असेल, चित्रपट पाहताना स्वत: ला प्रेमळ जोडप्यामध्ये पाहण्यास सुरुवात केली असेल आणि तुमच्या विचारांमध्येच नाही तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तिच्याशी जोडण्यास सुरुवात केली असेल तर तुम्ही नक्कीच कोणाच्यातरी प्रेमात पडत आहात.
इतर कोणापेक्षा स्वतःकडे अधिक लक्ष देणे : असे बरेचदा घडते की आपण आपले कपडे, जीवनशैली आणि वैयक्तिक गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही. परंतु जर गेल्या काही दिवसांपासून तुम्ही तुमच्या प्रत्येक लहान-सहान गोष्टीवर लक्ष केंद्रित करू लागला असाल किंवा तुमचा ड्रेसिंग सेन्स बदलू लागला असेल तर स्वतःला आरशात पहा, मग खात्री आहे की तुम्ही कोणाच्यातरी प्रेमात पडला आहात. तुमच्या भावना ओळखा आणि ज्याच्यासाठी तुमच्या अंतःकरणात मनापासून प्रेम आहे तिच्याशी त्या व्यक्त करा.