गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : अल्पवयीन चुलत बहिणींचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. गंगापूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. ही घटना शनिवारी (३ ऑगस्ट) दुपारी घडली.
जाखमातवाडी (ता. गंगापूर) येथील एक १३ वर्षांची आणि दुसरी १५ वर्षांची अशा दोघी चुलत बहिणींना कुणीतरी फूस लावून पळवून नेले आहे. त्यातील एका मुलीच्या वडिलांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की शनिवारी लहान भावाची पत्नी व दोन्ही मुली घरी होत्या. दुपारी लहान भावाच्या पत्नीने कॉल करून सांगितले, की दोन्ही मुली घरात दिसत नाहीत. त्यांना कुणीतरी फूस लावून पळवून नेले आहे. मुलीच्या वडिलांनी नातेवाइकांना कॉल केले. पण त्यांच्याकडेही त्या गेल्या नसल्याचे समोर आले. अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली.