छत्रपती संभाजीनगर(सीएससीएन वृत्तसेवा ) : सकल मराठा समाजातर्फे क्रांती चौकात सोमवारी (5 ऑगस्ट) सायंकाळी जोरदार निदर्शने करत भाजप खासदार अनिल बोंडे व नारायण राणे यांचा निषेध केला. राणे, बोंडे यांचे पोस्टर जाळले. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलणार्यांना आवर घाला अन्यथा कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला जबाबदार सरकार असेल, असा इशारा आंदोलकांनी दिला. राणे यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा छत्रपती संभाजीनगरात आल्यावर त्यांची गाडी फोडू, असा इशाराही आंदोलकांनी दिला.
आंदोलनात सुरेश वाकडे, प्रा. चंद्रकांत भराट, नीलेश ढवळे, अरुण नवले, सुनील कोटकर, रेखा वाहतुळे, भगवान देवकर यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.