छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेचा छत्रपती संभाजीनगरात बुधवारी समारोप होत असल्याने आमखास मैदानावर होणार्या त्यांच्या सभेला ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल ओबीसी समाजाने केले आहे.
सकल ओबीसी समाजाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले, की अॅड. प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा समाजासाठी दिशा देणारी आहे. यात्रेचे ओबीसी समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. आरक्षणासाठी झटणारे अॅड. आंबेडकरच आमचे नेते असून समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
ओबीसी समाजातील 360 जातींच्या बांधवांनी आरक्षण बचाव यात्रा समारोपाला उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले. जरांगे यांचे आंदोलन भरकटले असून ते दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचाही आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.