छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मानलेल्या मावशीने ओळख करून दिलेल्या तरुणाने सिडको एन ३ परिसरातील केटली गार्डनमध्ये बोलावून घेत तरुणीसोबत अश्लील चाळे केले. ही घटना बुधवारी (३१ जुलै) घडली. तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी मानलेली मावशी रंजना बुट्टे व अल्फेज कुरेशी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, १ एप्रिल २०२४ रोजी तरुणी घरी असताना रंजना बुट्टे हिने तिला तिच्या घरी बोलावून घेतले. या ठिकाणी अल्फेज कुरेशी हा तरुणही होता. अल्फेज खूप चांगला मुलगा असून तू त्याच्याशी मैत्री कर, त्याला तू खूप आवडतेस, असे रंजनाने तरुणीला सांगितले. ओळखीनंतर तरुणीने एकदाच अल्फेजला कॉल केला. नंतर मला बोलू नको म्हणत संभाषण बंद केले. मात्र त्यानंतर अल्फेज तिच्या मागेच लागला. तिचा पाठलाग करून भेटण्यासाठी हट्ट धरू लागला. ती त्याला भेटायला केटली गार्डनमध्ये गेली असता त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. तिने ही बाब आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात रंजना व अल्फेजविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. वायाळ करत आहे.
मावशीच्या घरी आलेल्या मुलीचा विनयभंग…
बीड बायपास भागात राहणाऱ्या मावशीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीचा २९ जुलैला मोहम्मद जावेद (रा. आदर्श हॉटेलसमोर, बीडबायपास रोड) याने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. सातारा पोलिसांनी मोहम्मद जावेदविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. सोनवणे करत आहेत.