छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज, ५ ऑगस्टपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी ते १३ ऑगस्टपर्यंत दौरा करतील.
आज धाराशिवपासून दौरा सुरू होणार असून, उद्या ६ ऑगस्टला धाराशिवहून लातूरला जातील. ७ ऑगस्टला नांदेड, ८ ऑगस्टला हिंगोलीत ते असणार आहेत. ९ ऑगस्ट रोजी परभणी, तर १० ऑगस्ट रोजी ते बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. ११ ऑगस्टला ते जालन्यात असतील.