छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्ह्यातून व्यक्ती बेपत्ता होण्याचे चिंताजनक आहे. १ जुलैपासून ४ ऑगस्टपर्यंत तब्बल २३२ जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे. यात तब्बल १०९ महिला असून, वाळूज एमआयडीसीतून तब्बल २० महिला बेपत्ता झाल्या आहेत.
शहरात एकूण १७८ व्यक्ती बेपत्ता झाले. यात ८९ महिला आणि ८९पुरुषांचा समावेश आहे. यातील ४० तरुण तर ५९ तरुणी आहेत. जिल्ह्यात एकूण ९३ जण बेपत्ता झाले असून, यात ५० महिला व ४३ पुरुष आहेत. पैकी ३३ तरुणी व २१ तरुणींचा समावेश आहे. वाळूज एमआयडीसीतून तब्बल २० महिला बेपत्ता झाल्याने जिल्ह्यातील हा आकडा सर्वांत मोठा ठरला आहे.
चालू महिन्यात ऑगस्टमध्ये ४ दिवसांत शहरातून १२ जण बेपत्ता झाले असून, यात चंद्रकांत अमतकर (वय ५८, रा. पवननगर, सिडको), सानिया मोहम्मद मशकूर (वय २०, रा. मौलाना आझाद कॉलेज), विशाखा राहुल सावळसूरकर व साेबत मुलगा आदित्य राहुल सावळसूरकर (वय ३५, रा. छावणी), सुनिता समाधान पाईकराव (वय २८, रा. एकतानगर रांजणगाव शेणपुंजी), नासेर रोशन पठाण (वय २०, रा. शहानगर, मसनतपूर), शाहिस्ता महेमूद शाह (वय ३४, रा. नारेगाव), परवीन रिजवान खान (वय २८, रा. नारेगाव), दुर्गा अनिल वैरागड (वय ३२, रा. छावणी), माधुरी ईश्वरी जाधव (वय १८, रा. रांजणगाव शेणपुंजी), अश्लेषा करण राऊत (वय २१, रा. रांजणगाव शेणपुंजी), विशाखा महेंद्र गुत्तीकर (वय ३८, रा. संसारनगर), सुचिता सोमेश्वर मुंडीक (वय ३८, रा. विठ्ठलनगर सिडको एन २) यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातून गेल्या ४ दिवसांत बेपत्ता झालेल्यांमध्ये ६ जण असून, यात शोभा अंकुश गायकवाड (वय ४०, रा. करमाड), वैष्णव दीपक चांदणे (वय १८, रा. हर्षी, ता. पैठण), वैष्णवी बाबासाहेब जगताप (वय २६, रा. जयसिंगनगर, गंगापूर), राहुल संतोष लांडगे (वय १९, रा. पिशोर), विशाल सुरेंद्र चांदणे (वय २६, रा. हर्षी, ता. पैठण), सरला सचिन गिरी (वय २४, रा. पिशोर) यांचा समावेश आहे.