गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रूक येथील सुनीता दादाराव आरगडे (वय ३८) या महिलेने गावाच्या शिवारातील स्वतःच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (३ ऑगस्ट) सकाळी दहाला समोर आली.
सुनीताचा मृतदेह विहिरीत आढळल्यानंतर नातेवाइकांनी तिला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दुपारी साडेबाराच्या सुमारास आणले. मात्र तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या पार्थिवावर धामोरी बुद्रूकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सुनीता यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घटनेची नोंद वाळूज पोलिसांनी केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार कारभारी देवरे, बीट जमादार सुकदेव भागडे करत आहेत.