वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील नारळा येथे नोकरी मिळत नसल्याने विष पिऊन राहुल गोरख नळे (वय ३१) याने राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (३ ऑगस्ट) सकाळी दहाला समोर आली.
राहुल पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. कोरोना काळापासून त्याची नोकरी गेली. तेव्हापासून तो नोकरीच्या शोधात होता. मात्र, त्याला अपेक्षित अशी नोकरी मिळत नव्हती. त्याला नैराश्य आले. या नैराश्यातून त्याने शुक्रवारी रात्री विष घेतले. शनिवारी सकाळी ही बाब समोर आली. राहुलच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.