छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कौटुंबिक कारणातून ३३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आंबेडकरनगर, सिडको एन-७ येथे बुधवारी (३१ जुलै) रात्री घडली. अजय माणिकराव प्रधान असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
अजय खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. काही दिवसांपासून तो तणावात होता. बुधवारी रात्री त्याने खोलीत जाऊन गळफास घेतला. ही बाब नातेवाइकांच्या लक्षात येताच घाटी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिडको पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.