छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा हात धरून तरुणाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दशमेशनगरमधील महादेव मंदिराजवळ बुधवारी (३१ जुलै) घडली.
गौरव अनिल रुपेकर असे संशयिताचे नाव आहे. तो फेब्रुवारीपासून मुलीचा पाठलाग करायचा. ती प्रतिसाद देत नसल्याने काही दिवसांपासून तिला शिवीगाळ करत होता. तिच्याशी बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिने ही बाब तिच्या वडिलांना सांगितली. तिच्या वडिलांनी त्याला जाब विचारला असता त्याने तिच्या वडिलांनाही मारहाण करण्याची धमकी दिली. ३१ जुलैला तर त्याने कहरच केला. मुलीचा हात पकडून जवळ ओढत विनयभंग केला. अखेर पालकासह येऊन मुलीने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात आहे.