छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रिक्षाने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय महिला जखमी झाली. ही घटना मुकुंवाडीतील दीपाली हॉटेलसमोर मंगळवारी (३० जुलै) दुपारी घडली.
दर्शना रामपाल भुंबक (वय ५३, रा. गणेशनगर, गारखेडा परिसर) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या चिकलठाण्यातील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात सफाई कामगार आहेत. त्या ड्युटी संपल्याने घरी परतत होते. मुकुंदवाडीत रिक्षातून उतल्यानंतर दुसऱ्या रिक्षाची वाट पाहत असताना MH20 EK1302 क्रमांकाच्या रिक्षाचालकाने अचानक त्याची रिक्षा मागे घेत त्यांना धडक दिली. पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार दिगंबर धारबाले करत आहेत.