छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (२ ऑगस्ट) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा : दुपारी १२ वा ४५ मि.नी शासकीय विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व मोटारीने सिल्लोडकडे रवाना. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री : महिला सशक्तिकरण अभियान आणि मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर), दुपारी साडेतीन वा. मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ४ वा. १५ मि. नी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.
अवजड वाहतूक मार्गात बदल
सिल्लोडला मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होणार असल्याने शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ७ दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत. वाहतुकीतील बदल असे : छत्रपती संभाजीनगर ते जळगावकडे जाणारी जड वाहने छत्रपती संभाजीनगर – भोकरदन – अन्वा – शिवना – अंजिठामार्गे जळगावकडे जातील. जळगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी जड वाहतूक करणारी वाहने जळगाव- अंजिठा- शिवना-अन्वा – भोकरदन-हसनाबाद- पाल फाटा- फुलंब्रीमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील.