छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील डिफेन्स करिअर ॲकॅडमीत एनडीएसाठीच्या ३५० कॅडेटकरिता सहा दिवशीय दोन बॅचेसचा लाईफ ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम १० ते २३ जुलैदरम्यान पार पडला. या वेळी प्रसिद्ध संमोहन तज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांनी विद्यार्थ्यांना सुपर माईंड पॉवरच्या थराराचा अनुभव झाला. यामुळे सारेच प्रभावित झाले.
संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान डिफेन्स करिअर ॲकॅडमीचे सर्वेसर्वा ज्ञानयोगी राणे, सीईओ श्री. टकले यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी संमोहन तज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांनी पॉवर ऑफ सबकॉन्सीअस माईंडद्वारे विद्यार्थ्यांच्या ब्रेनमध्ये प्रोग्रामींग करून शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमतांचा चारपट विकास, व्यक्तीमत्वात हवे तसे बदल, स्मरणशक्ती विकास, स्टेज डेअरिंग, इफेक्टीव्ह कम्युनेशन स्कील, एस. एस. बी. इंटरव्ह्यू पूर्वतयारी करून घेतली.
हा कार्यक्रम आता छत्रपती संभाजीनगरच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शनिवार, ३ ऑगस्ट व रविवार, ४ ऑगस्टला सायंकाळी ७ते ९ शहरातील तापडिया नाट्य मंदिरात आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत असला तरी नाव नोंदणी आवश्यक आहे. इच्छुक विद्यार्थी, पालकांनी 9850170936 वर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजक एस. एम.पी .लाईफ सोल्युशनने केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या समस्या सुटणार…
मन एकाग्र होत नाही
स्मरण शक्ती व आत्मविश्वासाचा अभाव
सतत राग व चिडचिडेपणा
नकारात्मक, नको ते विचार सतावतात
परीक्षा इंटरव्ह्यू, सेमिनार, ओरलची भिती
कळतंय पण वळत नाही अशी स्थिती
मानवी स्नेहसंबंध जमत नाही
डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता
घरात अशांती, नोकरी तसेच व्यवसायात अपयश
तज्ज्ञ एस. के. नांदेडकर म्हणतात…
मानसिक क्षमतांचा विकास अत्यंत महत्त्वाचा असून, स्पर्धात्मक युगात आपण आपल्या पाल्यांच्या मानसिक क्षमतांना प्रथम प्राधान्य देणे अत्यंत म्हत्वाचे आहे. धैर्य, जिद्द, चिकाटी, स्टेज डेअरिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट, स्टडी मॅनेजमेंट, हॅबिट मॅनेजमेंट अभावी अनेक मुलांची मानसिकता बिघडून ते व्यसनाधीन होत चालले आहेत. मानसिक क्षमता विकासित करणारा लाईफ ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पालकांनी आपल्या पाल्याला या कार्यक्रमाला नक्की आणावे. येण्याआधी 9850170936 वर नोंदणी करणे अनिवार्य आहे करावी, असे आयोजक एस.एम.पी,लाईफ सोल्युशन्स यांनी कळवले आहे.