छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात २ ऑगस्टपासून सिल्लोड येथून होणार आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे.
राज्य शासनाने महिला सशक्तीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली असून त्यातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी या सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ करून हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे.