दिल्लीची गर्ल सान्या मल्होत्रा बऱ्याच काळापासून फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग आहे. तिने अशा अनेक भूमिका केल्या आहेत, ज्यामुळे तिचे कौतुक केले जाते. सान्या सध्या दिल्लीत पावसाचा आनंद घेत असून तिने याबाबत केलेली बातचीत…

सान्या म्हणाली, मला वाटत होते की जर मी मुंबईच्या पावसातून दिल्लीला येत आहे, तर कदाचित मला इथे थोडा सूर्यप्रकाश पाहायला मिळेल. पण दिल्लीतही पावसाने माझे स्वागत केले. दिल्लीत पाऊस पडताच वाहतूक कोंडी होते. विमानतळावरून मध्य दिल्लीला पोहोचायला मला दोन तास लागले. मुंबईत राहून पावसाची सवय झाली आहे. तेथे महिनाभर पाऊस पडतो. त्यामुळे मी त्यासाठी तयार असते. पावसामुळे काहीही थांबत नाही. तिथल्या लोकांना त्याची सवय झाली आहे. प्रत्येकाकडे छत्री, रेनकोट आणि अतिरिक्त कपडे आहेत. पण इथे दिल्लीत अचानक पाऊस कधी पडेल हे कोणालाच माहीत नाही. त्याचा परिणाम वाहतुकीवर दिसून येतो. बऱ्याच दिवसांनी पावसामुळे ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने जुने दिवस आठवले, जेव्हा कॉलेज संपल्यावर घरी जायचे असायचे आणि पाऊस पडायचा, तेव्हा घरी पोहोचायला कित्येक तास लागायचे.

पावसाळ्यात दिल्लीत पकोडे आणि चहाप्रेमींची कमी नाही. सान्याला विचारले की तिच्यावर पाण्याचे थेंब पडताच तिलाही पकोडे (भजी) खायला आवडते का? त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, अर्थात मलाही पाऊस पडताच पकोडे आठवतात. साधारणपणे मी चहा पीत नाही, पण माझ्या घरी सर्वजण भरपूर चहा पितात आणि पकोडे खातात. माझी आई पाऊस पडला की पकोडे बनवते. मी तुम्हाला सांगते की माझी आई खूप चांगले पकोडे बनवते. विशेषतः तिने बनवलेले पालक आणि कोबीचे पकोडे अप्रतिम आहेत. सान्या म्हणाली, की सेलिब्रिटी म्हणून विविध प्रकारच्या उत्पादनांच्या जाहिरातींसाठी ऑफर मिळतात. परंतु मी या गोष्टींबद्दल खूप विचार करते.