छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ३० वर्षीय हिंदू महिलेला धर्मांध युवकाने वासनेसाठी जणू लैंगिक गुलाम (Sex Slaves) बनवून ठेवले. अडीच वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर मेस चालवून ती सासू-सासरे, दोन मुलांचे पोट भरते. जेवणाचा डबा देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्यावर नराधमाने बलात्कार केला. या बलात्काराचे फोटो काढून नंतर त्या आधारे तिला ब्लॅकमेल सुरू केले. जानेवारीपासून सुरू झालेला हा ब्लॅकमेलचा खेळ शरीरसुखासाठी तिला बेदम मारहाण करण्यापर्यंत गेला… वाढत्या अत्याचारामुळे अखेर महिलेले सातारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी शाहरुख शेख (रा. आमेरनगर, बजाज हॉस्पिटलमागे, सातारा परिसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
बीड बायपास भागात राहणाऱ्या पीडित महिलेने २६ जुलैला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ती सासू- सासरे, दोन मुलांसह राहते. तिचे पती अडीच वर्षांपूर्वी वारलेले आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तिने सातारा परिसरातील आमेरनगरात शाहरुख शेखच्या वडिलांच्या मालकीचा गाळा किरायाने घेऊन तिथे मेस सुरू केली. जानेवारी २०२४ पासून शाहरुखची पत्नी गरोदर असल्याने तो अधूनमधून पीडित महिलेकडून जेवणासाठी डबा घेऊन जात होता. तेव्हापासून त्याची आणि महिलेची ओळख झाली होती. फेब्रुवारीत एकेदिवशी रात्री आठला शाहरुखने महिलेला कॉल करून सांगितले, की मी घरी नाही.
माझा जेवणाचा डबा घेऊन माझ्या घरी ठेवून दे… त्यामुळे महिला त्याचा डबा घेऊन त्याच्या घरी आली. त्यावेळी शाहरुख घरीच होता. त्याच्या घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने महिलेचा हात धरून घरात ओढले व तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. यावेळी त्याने शारीरिक संबंधाचे फोटोही काढले होते. त्यानंतर त्याने धमकी दिली, की मी तुला सांगेल त्यावेळी तू मला भेटायला यायचे. आली नाहीस तर तुझे फोटो फेसबुकवर टाकेल व तुझी बदनामी करेल. तुझ्या मुलांना किडनॅप करेल. त्यामुळे विवाहिता घाबरून गेली.
मराठा हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा बलात्कार…
या घटनेची दहशत तिच्या मनात इतकी बसली की ती कुणालाच काही बोलू शकली नाही. त्यानंतर मे २०२४ मध्ये शाहरुखने त्याच्या मोबाइलवरून तिला कॉल करून रेल्वेस्टेशन परिसरातील मराठा हॉटेलमध्ये बोलावून घेतले. महिला तिथे गेल्यानंतर त्याने “तू मला खर्चायला पैसे दे. नाहीतर मी तुझे फोटो व्हायरल करेल’, अशी धमकी दिली. महिलेने त्याला पैसे न दिल्याने त्याने धमकी देऊन तिला मराठा हॉटेलमध्ये नेले. तिथे रूम बुक करून तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो सतत फोन करून तिला त्रास देऊ लागला. महिलेने दोन महिन्यांपासून त्याचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला.
२६ जुलैला केली बेदम मारहाण…
२६ जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास महिला घरी असताना शाहरुख शेखने तिला दुसऱ्या नंबरवरून कॉल करून गोदावरी लॉन येथे बोलावून घेतले. तिथे त्याने तिच्याकडे मोबाइल मागितला. त्याचा ब्लॉक केलेला नंबर काढून टाक, असे सांगितले. तिने नकार दिला असता त्याने शिवीगाळ करून तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. शाहरुखचा त्रास असह्य झाल्याने अखेर महिलेने सातारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शाहरुखविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कामठे करत आहेत.