छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : डॉ. वरुण बाळासाहेब गवळी (वय ४०, रा. एन-१ सिडको, छत्रपती संभाजीनगर)… शहरातील वैद्यकीय क्षेत्रात प्रसिद्ध नाव… जालना रोडवरील चिकलठाणाजवळील सर्वांत मोठ्या हॉस्पिटलमध्ये तो कार्यरत… पत्नी, मुलांसह सुखात संसार सुरू होता… पण सहकारी डॉक्टर युवतीच्या प्रेमात पडला अन् आता आजवर मिळवलेली प्रतिष्ठा धुळीस मिळवून बसला आहे… या डॉक्टर युवतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याने गेल्या २ वर्षांत तिचा दर महिन्यात ३-४ वेळेस उपभोग घेतला… पण जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा खोटेनाटे बोलून तिला बनविण्याचा प्रयत्न केला… तिनेही लग्नाची जिद्द ठेवत आता त्याला कायद्याने धडा शिकवला आहे… सिडको पोलीस ठाण्यात तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच डॉ. वरुण पसार झाला आहे. सहा दिवसांपासून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी त्याच्या घराचीही झडती घेतली… क्षणिक मोहापायी आयुष्याचे मातेरे करून घेणाऱ्या या हायप्रोफाईल वासनाकांडाची ही एफआयआरवर आधारित क्राइम स्टोरी…
३० वर्षीय प्रिया (नाव बदलले आहे) गारखेडा परिसरातील उल्कानगरीत आई व आजी- आजोबांसह राहते. १० एप्रिल २०२१ रोजी सिडको एमआयडीसीतील जालना रोडवरील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये रेसीडेन्ट मेडीकल ऑफीसर (RMO) म्हणून ती रुजू झाली. त्याठिकाणी डॉ. वरुण बाळासाहेब गवळी (वय ४०, एन-१ सिडको, छत्रपती संभाजीनगर) हा कोविड काळात कोविडच्या वॉर्डमध्ये चेस्ट फिजिशियन म्हणून काम पाहत होता. त्यादरम्यान त्याच्याशी प्रियाची ओळख झाली. कोविड कालावधीत उत्कृष्ठ काम केल्याने डॉ. वरुणने प्रिया व तिच्यासोबत काम करणाऱ्या इतर महिला सहकाऱ्यांना ताज विवांता या हॉटेलमध्ये सन २०२१ मधील जूनच्या पहिल्या आठवड्यात डिनर पार्टी दिली. त्यानंतर प्रिया व डॉ. वरुण हे बऱ्याच पार्ट्यांना एकत्र गेले. त्यादरम्यान दोघांत चांगली मैत्री झाली.
आधी उपकाराच्या ओझ्याखाली घेतले….
जून २०२२ मध्ये कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रिया व तिच्यासोबत इतर काही जणांना कामावरून कमी करण्यात आले. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रियाला डॉ. वरुणने कॉल केला. तो प्रियाला म्हणाला की, मला माहीत झाले आहे की तुला हॉस्पिटलमधून रिलीव्ह केले आहे. मी तुला मॅनेजमेन्टशी बोलून परत जॉईन करून घेण्यास सांगतो. त्यानुसार प्रियाला हॉस्पिटलमधून कॉल आला. ते प्रियाला म्हणाले की, तुम्ही उद्यापासून हॉस्पिटल परत जॉईन करा. तसेच आपण डॉ. गवळी यांच्या OPD मध्ये RMO म्हणून जॉईन करा. त्यांच्या सांगण्यावरून प्रिया ही डॉ. वरुण गवळी याच्या OPD मध्ये जॉईन झाली. गवळी तिचा बॉस असल्याने त्याने सांगितलेली सर्व कामे प्रिया पाहत होती. यादरम्यान डॉ. वरुण गवळीने बऱ्याच वेळेस तिला कॉफी, लंच व डिनर करण्यासाठी बाहेर जाऊ, असे म्हणल्याने व त्यानेच परत कामावर जॉईन करून घेतल्याने प्रियाला नाही म्हणता आले नाही. त्यामुळे ती त्याच्यासोबत लंच व डिनरसाठी जाऊ लागली. त्यादरम्यान त्याने तिला बऱ्याच वेळेस ड्रिंक (दारू पिण्यास) करण्यासाठी आग्रह केला. परंतु प्रियाने ते घेण्यास नकार दिला. तसेच डॉ. वरुण तिला म्हणाला की, आपण दोघे रूम घेऊ. जेणेकरून हॉटेल बंद झाले तरी उशीरापर्यंत पार्टी करता येईल. त्यानंतर सन २०२२ च्या ऑगस्टमध्ये डॉ. वरुणने लेमन ट्री हॉटेलमध्ये दोघांसाठी रूम घेतली. त्याठिकाणी दोघांनी डिनर केले. त्याठिकाणी त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले. तेव्हा प्रियाने त्याला विचार करून सांगते, असे म्हटले.
…मग उपभोग सुरू केला!
१२ सप्टेंबरला वाढदिवस असल्याने त्याने ११ सप्टेंबरला २०२२ रोजी हॉटेल लेमन ट्री येथे रूम बुक केली. तेथे त्याने तिला एन्गेजमेन्ट रिंग घातली. जेवण करतेवेळी त्याने तिला ड्रिंक (दारु) घेण्याचा आग्रह केला. प्रिया नाही म्हणत असताना त्याने तिला जबरदस्ती ड्रिंक (दारू) घेण्यास सांगितली. त्यावेळी त्याने दिलेली ड्रिंक प्रियाने घेतली. त्यावेळी प्रिया त्याला म्हणाली की, तू पण ड्रिंक (दारू) घे. त्यावेळी तो म्हणाला, की मला हॉस्पिटलमध्ये कधीही जावे लागू शकते. त्यामुळे मी आज घेऊ शकत नाही. त्यावेळी त्याने प्रिया ड्रिंकच्या नशेत असताना तिच्या ईच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दुसऱ्या दिवसी त्याने प्रियाला दोघांचे त्याच्या मोबाईल, लॅपटॉप तसेच त्याच्या टॅबमध्ये सेव्ह केलेले रात्रीचे फोटो दाखविले. तिच्या फोनमधले फोटोज आणी व्हिडीओज त्याने त्याच्या फोनमध्ये घेऊन तिच्या फोनमधले फोटोज आणी व्हिडीओज डिलीट केले. तो म्हणाला, की ही आपली गोल्डन मेमरीज आहेत आणि आपण लवकरच लग्न करू. प्रियानेही त्याच्यावर विश्वास ठेवला.
महिन्यात ३-४ वेळा सेक्स…
त्यानंतर १२ सप्टेंबर २०२२ ते १८ मे २०२४ या काळात डॉ. वरुणने प्रत्येक महिन्यात ३ ते ४ वेळा तिला छत्रपती संभाजीनगर शहरातील फर्न, अमरप्रीत, लेमन ट्री, ताज विवांता, रामा इंटरनॅशनल अशा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये तिला नेले. त्याठिकाणी त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यानंतर प्रियाने त्याला आपण लग्न कधी करायचे, असे विचारायला सुरुवात केली. त्यावेळी तो तिच्याशी भांडत होता. तिला म्हणायचा की तुझा माझ्यावर विश्वास नाही का? माझे घरी थोडा प्रॉब्लेम सुरू आहे. तो सॉल्व्ह झाला की आपण लग्न करू. त्यानंतर मात्र तो तिला टाळण्याचा प्रयत्न करत असल्याने तिने त्याच्या घराचा पत्ता शोधून काढला. त्याच्या घरी ती १८ मे २०२४ रोजी गेली. तिथे तिला एक महिला भेटली. त्यावेळी प्रियाने तिला विचारले असता ती महिला म्हणाली, की वरुणचे लग्न झाले असून मी त्याची बायको आहे. त्यावेळी प्रियाला कळले की वरुणचे लग्न झालेले आहे. त्यानंतर प्रियाने त्याला कॉल करून याबाबत विचारणा केली असता तो म्हणाला की, माझे लग्न झालेले आहे. मात्र माझा तिच्यासोबत घटस्फोट झालेला आहे. तिने माझे घर बळकावले आहे. मी तुला वाटलेच तर डिव्हॉर्सचे पेपर्स आणून दाखवितो. त्यामुळे प्रियाने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
कारमध्येही शारीरिक संबंध…
१ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री साडेबाराला तो प्रियाच्या घराजवळ आला. हॉर्न वाजवून तिला खाली बोलावले. प्रिया त्याच्यासोबत कारमध्ये बसली. दोघे जालना रोडवरील कच्च्या रस्त्यावर आले. तो तिला म्हणाला की, आपण दोन आठवड्यांत लग्न करणार आहोत. त्यावेळी त्याच्या कारमध्येच दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. प्रियाने त्याच्याकडे डिव्होर्सच्या पेपरबद्दल विचारणा केली तेव्हापासून तो तिला टाळत आहे. त्याचा फोनसुद्धा घेत नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा मस्के करत आहेत.