मुंबई : होळीच्या दिवशी जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमरावती एक्स्प्रेस एका ट्रकला धडकली. ट्रक धान्याने भरलेला होता. जळगावमधील बोदवड येथून अमरावती एक्स्प्रेस जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, जुन्या रेल्वे फाटकातून एक ट्रक जात होता. या ट्रकने थेट एक्सप्रेसच्या इंजिनला धडक दिली. ट्रक पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
अंबा एक्सप्रेस ट्रेन मुंबईहून निघाली होती. ती अमरावतीला जात असताना धान्याने भरलेला ट्रक रेल्वे रुळावर थांबला आणि ट्रेन ट्रकला धडकली. ट्रेनच्या इंजिनचे मोठे नुकसान झाले. ट्रेनच्या पुढच्या भागाला आग लागली. ती लगेच विझवण्यात आली. रेल्वे अपघातानंतर, ट्रॅक विस्कळीत झाला आणि रेल्वे वाहतूक थांबवावी लागली.