अभिनेत्री नर्गिस फाखरीने तिचा प्रियकर आणि अमेरिकास्थित व्यावसायिक टोनी बेगशी गुपचूप लग्न केले आहे. नर्गिसने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लग्नानंतर नर्गिस आणि टोनी स्वित्झर्लंडच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये त्यांचा हनिमून साजरा करत आहेत.

कॅलिफोर्नियातील एका आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रांनाच आमंत्रित करण्यात आले होते असे म्हटले जात आहे. हे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले. नर्गिस आणि टोनी यांनी लग्नादरम्यान कोणीही त्यांचे फोटो काढू नयेत याची खात्री केली होती. हा एक अतिशय खासगी समारंभ होता.

नर्गिसने तिच्या इंस्टाग्रामवर स्वित्झर्लंडचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती टोनीसोबत पोज देताना दिसत आहे. ज्यामुळे त्यांच्या लग्नाच्या बातमीला पुष्टी मिळते. नर्गिस आणि टोनी २०२१ पासून एकमेकांना डेट करत आहेत. टोनी हा लॉस एंजेलिसमध्ये एक व्यावसायिक आहे. नर्गिसचा जन्म काश्मीरमध्ये झालेला आहे. नर्गिसने काही वर्षांपूर्वी उदय चोप्राला डेट केले होते. नर्गिस हरी हर वीरा मल्लू: भाग १ आणि हाऊसफुल ५ चित्रपटात मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.