अभिनेता गोविंद आणि सुनीता आहुजा यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही येत असल्याने नेमके असे काय घडले याचा विचार करून चाहते हैराण आहेत. गोविंदाच्या मॅनेजरच्या मते, सुनीता यांनी अभिनेत्याला कायदेशीर नोटीस पाठवली असली तरी, गोविंदाने त्यावर कोणतीही कायदेशीर प्रतिक्रिया दिलेली नाही. यादरम्यान सुनीता आहुजाच्या अनेक जुन्या मुलाखती व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि गोविंदाबद्दल अनेक खुलासे केले होते.
काही वृत्तांनुसार, ६१ वर्षीय गोविंदाचे ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध आहेत. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सांगितले की, सुनीताने यापूर्वी जे काही विधान केले होते ते खूपच हास्यास्पद आणि विचित्र होते. यामुळे लोकांना बोलण्याची संधी मिळाली. तथापि, सुनीता यांनी निश्चितच नोटीस पाठवली आहे. पण गोविंदा आणि सुनीता यांनी त्यांच्या विभक्त होण्याच्या वृत्तावर अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. सुनीता आणि गोविंदा यांचे लग्न ११ मार्च १९८७ रोजी झाले आणि ते दोन मुलांचे पालक आहेत. सुनीताच्या बहिणीचे लग्न गोविंदाच्या मामाशी झाले होते. या लग्नात गोविंदाने सुनीताला पहिल्यांदा पाहिले. त्यावेळी गोविंदा बी.कॉम करत असताना, सुनीता नववीत होती.
दरम्यान, गोविंदाची भाची आरती सिंह हिने या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, की या सर्व असून, त्यांचं नातं खूप मजबूत आहे. ते घटस्फोट कसे घेऊ शकतात? मला माहीत नाही की अशा सर्व अफवा कुठून येतात? लोकांनी इतरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चुकीची माहिती पसरवू नये. खरं तर माझ्या घटस्फोटाच्या बातम्याही विनाकारण पसरल्या होत्या. अशा निराधार चर्चा नात्यांमध्ये तणाव निर्माण करतात.मी सध्या मुंबईत नाही त्यामुळे मी कोणाशीही संपर्क करू शकले नाही, असेही तिने सांगितले.
सुनिता काय म्हणाली?
सुनीता आहुजाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत गोविंदाबरोबर सध्या राहत नसल्याचं सांगितलं होतं. गोविंदा बंगल्यात राहतो, तर सुनीता मुलगी टीना व मुलगा यशवर्धनबरोबर फ्लॅटमध्ये राहते. मी आमच्या लग्नात पूर्वी खूप सुरक्षित होते, आता नाही, असं ती म्हणाली होती. जेव्हा तो तरुण होता तेव्हा इतकं काम करायचा की त्याच्याकडे अफेअर्ससाठी वेळ नव्हता. पण आता मला भीती वाटतं की रिकामा वेळ आहे तर काही करायला नको, असं सुनीताने म्हटलं होतं.