सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : विजेचा धक्का लागून संतोष माणिकराव शेळके (वय ३८, रा. आमसरी) या युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे बुधवारी (१० जुलै) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
संतोष बुधवारी दुपारी शेतावरील विहिरीजवळ मोटार चालू करण्यास गेला होता. त्याचवेळी त्याला विजेचा धक्का लागला. जागीच त्याचा मृत्यू झाला. अजिंठा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप कोथलकर, भागवत शेळके करीत आहेत.