Monday, May 12, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home सिटी क्राईम

एमजीएमच्या विद्यार्थिनीला कॉल करून म्हणे, हॉटेलवर झोपायला ये…!

एमजीएमच्या विद्यार्थिनीला कॉल करून म्हणे, हॉटेलवर झोपायला ये…!
बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एमजीएमच्या विद्यार्थिनीला कॉल करून छेड काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कॉल करणाऱ्याने तिला अश्लील मागणी करत हॉटेलमध्ये झोपायला ये, असे बोलून विनयभंग केला. सिडको पोलिसांनी त्‍या कॉल करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्‍याचा शोध घेतला जात आहे.

पीडित विद्यार्थिनी एमजीएम कॉलेजमध्ये शिकते व होस्टेलमध्ये राहते. तिला ५ ते ८ जुलैदरम्यान एका अज्ञात कॉलरने कॉल केले. सुरुवातीला अश्लील बोलायला सुरुवात केली. तिने त्‍याला जाब विचारला असता त्‍याने शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्‍यामुळे हादरून गेलेल्या विद्यार्थिनीने सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता त्‍या कॉल करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

संतापजनक… पाचवर्षीय चिमुकलीचा वडिलांकडूनच विनयभंग
मुकुंदवाडीत पाचवर्षीय चिमुकलीचा वडिलांकडूनच विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या आईनेच या प्रकरणात पतीविरुद्ध तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नराधम फरारी झाला. मुलगी कायम घाबरलेली राहत असल्याने आईने विचारणा केली. मात्र तिने काही सांगितले नाही. त्‍यानंतर आईला संशय आल्याने त्‍यांनी तिला मोबाइलवर गुड टच, बॅड टचचा व्हिडीओ दाखवला.

ते पाहून मुलगी अचानक रडू लागली तेव्हा ही घटना समोर आली. पप्पाही माझ्यासोबत असंच करतात, असे मुलीने सांगितल्यावर आईला धक्का बसला. तिने तिला अधिक बोलते केले असता वडील कपडे काढून मिठी मारतात, छातीवरून हात फिरवत असल्याचे मुलीने सांगितले. आईने मुलीला घेऊन मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. घोरपडे करत आहेत.

छावणीत आधी मुलीची छेड, नंतर तिच्या आईला मारहाण…
मुलीची छेड काढणाऱ्याची तक्रार करण्यासाठी मुलीची आई त्याच्या आई-वडिलांकडे गेली. तेव्हा तरुणासह त्‍याच्या घरच्यांनी मुलीच्या आईलाच मारहाण केली. ही घटना ६ जुलै रोजी रात्री ११:३० वाजता शहा कॉलनीत घडली. या प्रकरणात आता छावणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात अाली आहे. तक्रारीनुसार, पीडित मुलगी व संशयित तरुण एकाच परिसरात राहतात.

इफ्तेकार शहा मुलीचा पाठलाग करून छेड काढतो. तो कायम नशेत असतो. याबाबत मुलीने आईला सांगितले. त्‍यानंतर मुलीची आई त्याच्या आई-वडिलांकडे तक्रार करण्यासाठी गेली. त्‍यावेळी अन्सार शहा, निसार शहा, इफ्तेकारसह एका महिलेने त्यांना मारहाण केली. छावणी पोलिसांनी अन्सार, निसार, इफ्तेकारसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात आहे.

Previous Post

छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध उद्योजक मनीष धूत यांना दिल्लीच्या बनावट कंपनीकडून १ कोटींचा गंडा!

Next Post

विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्‍यू, सिल्लोडची दुर्दैवी घटना

Next Post

विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्‍यू, सिल्लोडची दुर्दैवी घटना

निळा टी-शर्ट, तोंडाला रुमाल बांधलेला तो CCTV त झालाय कैद…!; प्रयत्‍न केले पण अन्‌ वैतागून निघून गेला…चिकलठाण्यात घडलाय हा प्रकार…

छत्रपती संभाजीनगरात चोरट्यांचा उच्छाद : सीए दाम्‍पत्‍यासह महिला डॉक्‍टरचे घर फोडले!; ९ लाखांच्या ऐवजावर डल्ला, बन्सीलालनगर, पन्नालालनगरातील घटना, बजाजनगरातून तर घरासमोरून कार नेली…

महावितरणचा 'महा'लाचखोर कार्यकारी अभियंता धनाजी रामुगडे, उपव्यवस्थापक प्रवीण दिवेकर रंगेहात अटक

Recent News

रुद्र हॉटेलच्या मालकावर हल्ला, तिसगाव रोडवरील घटना, बेदम मारहाण करून हल्लेखोर गेले पळून…

तीक्ष्ण वस्‍तूने वार करून तरुणाला केले जखमी, तिघांचे कृत्‍य, समतानगरातील घटना

May 12, 2025
विटभट्टीवर काम करणाऱ्या दाम्‍पत्‍याची १५ वर्षीय मुलगी बेपत्ता, आईची वाळूज पोलिसांत तक्रार

शिवशंकर कॉलनीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

May 12, 2025
शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

May 12, 2025
बांधकाम कंत्राटदार अमोल पवार, बाळासाहेब पवार, तेजस्वी पवार निघाले फ्रॉड!; रुग्णालय बांधकामासाठी पावणेदोन कोटी घेतले, बांधकामाचा पत्ता नाही, वरून धमक्या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मदरशातून दोन मुलांचे अपहरण झाल्याने खळबळ

May 12, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |