Monday, May 12, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home सिटी क्राईम

चिकलठाणा पोलिसांचे चोरीवर पांघरुण!; १८ तारखेला चोरी गेलेल्या रिक्षाची तक्रारही घेईनात, उदरनिर्वाहाचे एकमेव साधन हिरावल्याने रिक्षाचालक हैराण

चिकलठाणा पोलिसांचे चोरीवर पांघरुण!; १८ तारखेला चोरी गेलेल्या रिक्षाची तक्रारही घेईनात, उदरनिर्वाहाचे एकमेव साधन हिरावल्याने रिक्षाचालक हैराण
बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक हैराण आहेत. दुसरीकडे पोलीस मात्र चोऱ्यांवर पांघरूण घालण्याचा प्रकार करत असल्याचे समोर आले आहे. देवळाईच्या म्हाडा कॉलनीतून रिक्षा चोरीला गेली. त्‍याची तक्रार घेऊन चिकलठाणा पोलीस ठाण्यात गेलेल्या रिक्षाचालकाची तक्रारच घेण्यात आली नाही. १८ फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेत अद्याप गुन्हा दाखल नाही. त्‍यामुळे रिक्षाचालकाने पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेऊन लेखी अर्ज देत उदरनिर्वाहाचे एकमेव साधलेली रिक्षा शोधून देण्यासाठी साकडे घातले आहे.

नक्‍की काय घडले?
चिकलठाण्याच्या हनुमान चौकात ईश्वर आगळे हे रिक्षाचालक राहतात. त्‍यांच्या मालकीची एमएच २० ईएफ ४३८३ ही रिक्षा आहे. रिक्षा चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सध्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते आपली रिक्षा देवळाईतील म्‍हाडा कॉलनीत त्‍यांच्या मित्राच्या घराजवळ उभी करत होते. १८ फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास ही रिक्षा चोरीला गेली. सकाळी आठला ही बाब लक्षात आल्यानंतर त्‍यांच्या मित्राने आगळे यांना कॉल करून सांगितले. त्‍यानंतर आगळे हे ताबडतोब मित्राच्या घराकडे गेले. दोघांनी मिळून परिसरात शोध घेतला. त्‍यानंतर मित्राच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासले असता त्‍यात दोन-तीन जण रिक्षा लोटत लोटत घेऊन जाताना दिसत आहेत.

त्‍यानंतर मित्रासोबत येऊन आगळे यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिथे पोलीस अंमलदार श्रीमती जाधव यांना घडलेली हकीकत सांगितली. त्‍यांनी चक्‍क तक्रार घेण्यास नकार दिला आणि साध्या पेपरवर नोंद करून घरी जायला सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १९ फेब्रुवारीला आगळे यांनी पोलिसांना विचारणा केली, मात्र त्‍यांनी उत्तर दिले नाही. २० फेब्रुवारीलाही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचे तक्रार अर्जात म्‍हटले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष
विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांनी वारंवार तक्रारदाराला देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल सूचना केल्या आहेत. मात्र त्‍याकडे चिकलठाणा पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. चोरीची तक्रार का घेतली जात नाही, याप्रकरणात गुन्हा का दाखल केला नाही, याबद्दल सामान्यांना प्रश्न पडला आहे. दरम्‍यान, ईश्वर आगळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे, की माझी एमएच २० ईएफ ४३८३ क्रमांकाची रिक्षा कुठेही दिसून आल्यास नागरिकांनी कृपया 9175012217 या क्रमांकावर कॉल करावा.

Previous Post

हिट ॲन्‍ड रन : दुचाकीला उडवून वाहन पसार, काकाचा मृत्‍यू, पुतण्या गंभीर, गंगापूरची घटना

Next Post

EXCLUSIVE : किती ही बनवाबनवी… ग्रा. पं. सदस्याचं तिसरं अपत्‍य मिनाक्षीचं की लक्ष्मीचं?, पाचोडच्या तत्‍कालिन वैद्यकीय अधीक्षकासह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
विधवेने हाणून पाडला संपत्तीतून बेदखल करण्याचा डाव!; आता ते उठलेत जिवावर, काय म्‍हटलंय २६ वर्षीय विवाहितेने तक्रारीत…, पैठण तालुक्‍यातील घटना

EXCLUSIVE : किती ही बनवाबनवी… ग्रा. पं. सदस्याचं तिसरं अपत्‍य मिनाक्षीचं की लक्ष्मीचं?, पाचोडच्या तत्‍कालिन वैद्यकीय अधीक्षकासह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारला हायवाने २० फूट फरपटत नेले, सिल्लोडमधील थरारक घटना

सुसाट हायवाने दुचाकीस्वार बांधकाम मजुराला उडवले, जागीच मृत्‍यू, बीड बायपासची घटना

मनोज जरांगेंना २० तारखेपर्यंत सरकारचे शिष्टमंडळ भेटणार; आ. संजय शिरसाट यांची माहिती

ठाकरे गटाने पैसे घेऊन निवडणुकीत तिकिटे वाटली, संजय शिरसाट यांचा आरोप

Recent News

रुद्र हॉटेलच्या मालकावर हल्ला, तिसगाव रोडवरील घटना, बेदम मारहाण करून हल्लेखोर गेले पळून…

तीक्ष्ण वस्‍तूने वार करून तरुणाला केले जखमी, तिघांचे कृत्‍य, समतानगरातील घटना

May 12, 2025
विटभट्टीवर काम करणाऱ्या दाम्‍पत्‍याची १५ वर्षीय मुलगी बेपत्ता, आईची वाळूज पोलिसांत तक्रार

शिवशंकर कॉलनीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

May 12, 2025
शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

May 12, 2025
बांधकाम कंत्राटदार अमोल पवार, बाळासाहेब पवार, तेजस्वी पवार निघाले फ्रॉड!; रुग्णालय बांधकामासाठी पावणेदोन कोटी घेतले, बांधकामाचा पत्ता नाही, वरून धमक्या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मदरशातून दोन मुलांचे अपहरण झाल्याने खळबळ

May 12, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |