छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : राज्यातील खाजगी व सहकारी दुध प्रकल्पात दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधासाठी ५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
दि.५ जुलै रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार या योजनेचा कालावधी १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ असा आहे. तरी जिल्ह्यातील खाजगी व सहकारी दुध प्रकल्पात दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी सहभागाचा अर्ज जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी छत्रपती संभाजीनगर , शासकीय दुध योजना, दुध डेअरी सिग्नल जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी श्रीमती एम.आर. हराळ यांनी केले आहे.