फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील एसटी बसस्थानकात मंगळवारी (९ जुलै) सकाळी ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. सुधाकर धोंडीबा कापसे (रा. विरमगाव) यांचा असल्याचे निष्पन्न झाले असून, ते काही दिवसांपासून बसस्थानक परिसरात राहत होते, असे नागरिकांनी सांगितले.
फुलंब्री पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सकाळी ९ च्या सुमारास बसस्थानक आवारात सुधाकर हे बेशुद्धावस्थेत मिळून आले. प्रवाशांनी फुलंब्री पोलिसांना कळवले. पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.