खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : गल्लेबोरगाव (ता. खुलताबाद) येथील वाल्मीक आसाराम मानकीकर याच्या दूध संकलन केंद्रावर गांजाची विक्री होत होती. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी (९ जुलै) दुपारी दोनला छापा मारून १० लाख रुपयांचा ८४ किलो गांजा जप्त केला. मानकीकरला अटक केली आहे.
मानकीकर हा दूध संकलन केंद्रावर गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशाने पथकाने छापा मारला. या वेळी खुलताबादचे नायब तहसीलदार डॉ. गणेश देसाई, रासायनिक विश्लेषक गोविंद भोसले, मंडळ अधिकारी भाग्यश्री दुतोंडे, तलाठी कल्पना डिघोळे, पोलीस पाटील सिंधू बढे, दुय्यम निरीक्षक शाहू घुले, सरपंच संतोष राजपूत यांची उपस्थिती होती. ही कारवाई उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, कन्नड विभागाचे निरीक्षक अशोक साळुंखे, निरीक्षक राहुल गुरव यांनी केली.