छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ओबीसींमध्ये निर्माण झालेली असुरक्षिता दूर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सरसावली आहे. त्यांच्या मदतीला धावून येत त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ओबीसी आरक्षण बचाव संवाद यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भातील निर्णय जिल्हा आढावा बैठकीत रविवारी (७ जुलै) घेण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभेदारी विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी मराठवाडा सचिव अमित भुईगळ, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, मराठवाडा संघटक महेश निनाळे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, योगेश बन, मिलिंद बोर्डे, अफसर खान, पंकज बनसोडे, रूपचंद गाडेकर, शाहीर मेघानंद जाधव, वैशाली राणेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.