छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्या जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री नाहीत, अशा १७ जिल्ह्यांत पक्षाचे संपर्कमंत्री नेमले आहेत. संघटनात्मक बळ मिळण्यासह सरकार आणि पक्षातील समन्वय राहावा, यासाठी या नियुक्त्या केल्या असून, छत्रपती संभाजीनगरचे संपर्कमंत्री म्हणून मंत्री अतुल सावे यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद मागूनही भाजपला मिळाले नाही. शिंदे गटाचे संजय शिरसाट पालकमंत्री झाले. आता अतुल सावे यांच्या नियुक्तीमुळे पक्षवाढीसाठी त्यांना समन्वयकाची भूमिका पार पाडावी लागेल. पंकजा मुंडे यांच्याकडे बीड, जयकुमार गोरे यांच्याकडे धाराशिव तर व मेघना बोर्डीकर यांच्याकडे हिंगोलीचे संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे.