छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज, ५ फेब्रुवारीला दुपारी सव्वाबाराला छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण आणि हवामान बदल ,पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे हेही होते.

प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी आ. अनुराधाताई चव्हाण, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर आष्टी येथील कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरीता हेलिकॉप्टरने रवाना झाले.